परिचय
केंद्र शासनाने पाणी व स्वच्छता ह्या दोन्ही बाबी एकमेकांशी निगडीत असल्यामुळे तसेच त्यांची अंमलबजावणी एकत्रपणे होण्याच्या अनुषंगाने सन 2012 मध्ये जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाची निर्मीती केली असून या विभागामार्फत खालील प्रमाणे केंद्र व राज्य पुरस्कृत कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) दुसरा टप्पा (2019-2025)-
देशातील ग्रामीण भागात स्वच्छतेची स्थिती व व्याप्ती लोकसहभागाच्या माध्यमातून वाढावी या उदात्त हेतुने केंद्र शासनाव्दारे ग्रामीण स्वच्छता कार्यक्रमाची पायाभरणी करण्यात आली. सन 1990 ते सन 2000-01 मधील केंद्रीय ग्रमीण स्वच्छता कार्यक्रम (सीआरएसपी), सन 2001 तेसन 2010 पर्यंतचे संपूर्ण स्वच्छता अभियान (टिएससी) तर 2012 ते 2014 पावेतोचे निर्मल भारत अभियान आणी यापुढे माहे ०२ ऑक्टोंबर २०१४ पासून मा.पंतप्रधान महोदयांच्या शुभहस्ते सुरु करण्यात आलेल्या स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) एसबीएम (जी) आणि ओडिएफ (हागणदारी मुक्त) दर्जा प्राप्त केल्यावर, एसबीएम (जी) टप्पा-2 हागणदारी मुक्त अधिक हा संपूर्ण स्वच्छता साध्य करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला आहे.
जल जीवन मिशन (फक्त उपक्रम योजना वगळुन)
केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाचे माध्यमातून सन-2019 पासून जल जीवन मिशन हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे.
यामध्ये प्रामुख्याने गावातील नळ पाणी पुरवठा योजना,कुटुंबांना कार्यात्मक नळ जोडणी (FHTC) सह, सदरच्या उपक्रमास लोकसहभाग व पारदर्शकता मिळवून देण्यासाठी विभागामार्फत विविध स्तरावर व्यापक प्रचार, प्रसिद्धी व क्षमता बांधणी करिता प्रशिक्षण आयोजित करण्यात येते.
पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रम
पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रम अंतर्गत जिल्हयातील ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांना गुणवत्तापुर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध होणेसाठी पिण्याचे पाणी स्त्रेातातील पाण्याची मान्सुनपुर्व व मान्सुन पश्चात जैविक व रासायनिक तपासणी तालुका प्रयोगशाळा व क्षेत्रीय तपासणी संच (एफटीके) च्या माध्यमातुन करणेसाठी सनियंत्रण करण्यात येते.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान.
जिल्हयात स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्यासाठी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अधिक परिणामकारकरित्या राबवुन ते सर्व ग्रामीण कुटुंबा पर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग शासन निर्णय क्र.सगाग्रा२०२२/प्र.क्र.३३/पापु-१६ दि.07.10.2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये सन 2022-23 व त्यापुढील कालावधीत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्याबाबत शासनस्तरावरुन मार्गदर्शक सुचना निगर्मित करण्यात आल्या आहेत.