बंद

    लघु पाटबंधारे विभाग

    परिचय

    ० ते ६०० हेक्‍टर पर्यंतच्‍या सिंचन क्षमतेची जलसंधारण कामे मृद व जलसंधारण विभाग जालना अंतर्गत कार्यान्वित केली जातात. जिल्‍हा परिषद सिंचन विभाग अंतर्गत ० ते १०० हेक्‍टर पर्यंतच्‍या सिंचन क्षमतेची जलसंधारण कामे कार्यान्वित केली जातात

    • ० ते १०० हेक्‍टर पर्यंतच्‍या ल.पा.योजनांची कामे (उदा.सिंचन तलाव / पाझर तलाव / गाव तलाव / सिमेंट नाला बंधारे ) करणे.
    • ० ते १०० हेक्‍टर सिंचन क्षमतेचे को.प.बंधारे बांधकाम करणे.
    • पूर्ण झालेल्‍या योजनांची विविध योजनांची विविध लेखाशिर्षांतर्गत निधी उपलब्‍धतेनुसार दुरुस्‍ती कामे करणे.
    • ग्रामपंचायती मार्फत वसूल करण्‍यात येणारे कर, घरपट्टी पाणी पट्टी, वीज पट्टी, पावसाळा हंगामात को.प.बंधा-यामध्‍ये लोकसहभागातून गेट टाकून पाणी अडविणे.

     

    थोडक्‍यात माहिती

     

    • आपल्या देशामध्ये ७० टक्के शेती ही पावसावर अवलंबून आहे. परंतु सध्या पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तसेच जलसंधारणाच्या मोठया प्रकल्पांचा शेतक-यांना फार उशिरा लाभ होत असल्याने सध्या लघु पाटबंधारे कामांना फार महत्व प्राप्त झाले आहे. लघु पाटबंधारे स्वरुपाची ० ते १०० हेक्टर मधील कामे अल्प कालावधीत पुर्ण होत असलेने त्याचा लाभ त्वरीत शेतक-यांना होत असतो. यामध्ये सामान्यपणे पाझर तलाव, गाव तलाव, को.प.बंधारे, सिंचन तलाव, सिमेंट बंधारे, साठवण तलाव अशी कामे केली जातात.
    • अशा ० ते १०० हेक्टर सिंचन क्षमतेमधील लघु पाटबंधारेची कामे जिल्हा परिषदेमार्फत शासनाच्या विविध लेखाशिर्षाअंतर्गत राबविली जातात. यासाठी जालना जिल्हा परिषदेकडे लघु पाटबंधारे विभाग असून त्या अंतर्गत ८ तालुक्यातील लघु पाटबंधारेची कामे लघु पाटबंधारे उपविभाग जालना, अंबड, भोकरदन, परतूर या चार  उपविभागामार्फत केली जातात.

     विभागाकडून करण्यात येणा-या विविध कामांची माहिती

    • पाझर तलाव/गाव  तलाव

    पाणी पाझरण्यासाठी उपयुक्त असलेल्या भुस्तरीय स्थळावर नाला पाहून मातीचा बंधारा बांधून त्यामध्ये पावसाळयात पाणी साठवण्यात येते. अशा प्रकारे साठविलेले पाणी पाझरून तलावाच्या खालील भागातील विहीरीच्या पाण्याची पातळी वाढते. तसेच पाझर तलावाखालील भूजलाची पातळी वाढविण्‍यास या तलावांचा उपयोग होतो. या तलावापासून होणारे सिंचन हे अप्रत्यक्ष स्वरुपाचे सिंचन असते. तलावातील उपलब्ध पाण्‍याचा उपयोग मत्स्यव्यवसायासाठी ही करता येतो.

    • कोल्हापुर पध्दतीचे बंधारे

    नदी किवा नाले यातून पावसाळयात वाहून जाणारे पाणी गेट टाकून  अडविले जाते. यास कोल्हापूर पध्दतीचे बंधारे असे म्हणतात. या मधून उपसा पध्दतीने शेतकरी शेतीला पाणी देऊ शकतो. ज्या ठिकाणी को.प.बंधा-याचे वरील बाजूस मोठे धरण/तलाव असतो त्यामधून वरचेवर पाणी सोडून को.प.बंधा-यामध्ये पाणी अडवून सिंचन केले जाते.

    • सिमेंट नाला बंधारा

    सदरचे बंधारे हे सतत वाहत्या ओढयावर या पध्दतीने बांधण्यात येतात की, वाहणारे पाणी सिमेंट बंधा-याव्‍दारे अडवून ठेवण्यात येते व पाटाव्‍दारे ते पाणी लाभ क्षेत्रातील शेतीस सिंचनासाठी वापरण्यात येते. या बंधारेव्‍दारे प्रत्यक्ष सिंचन केले जाते व सदरचे बंधारे हे जेथे पावसाचे प्रमाण जास्त प्रमाणात आहेत त्या ठिकाणीच बांधण्यात येतात.

    विभागाकडील विविध लेखाशिर्षाखालील माहिती

    •  जिल्हा वार्षिक योजना

    सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये  ल.पा. योजेने अंतर्गत २५ कामे मंजूर असून त्यात पाझर तलाव दुरुस्ती, नवीन सिमेंट नाला बांधकाम घेण्यात आले आहे . को.प.बंधारा बांधकाम व दुरुस्ती या लेखाशीर्ष अंतर्गत ५१ कामे नवीन को.प बंधारा बांधकाम व दुरुस्तीचे कामे मंजूर आहे.

    • जलयुक्त शिवार अभियान २.०

    सन २०२४-२५ मधील जलयुक्त शिवार अभियान २.०  योजने मधील १० कामे मंजूर आहे. सदरील योजनांतर्गत नवीन सिमेंट नाला बंधारा व पाझर तलाव दुरुस्तीचे कामे मंजूर आहे.

    • अटल भूजल योजना  

    अटल भूजल योजने अंतर्गत एकूण ५६ कामे मंजूर होते त्यापैक्की ५२ कामे पूर्ण झाली आहे उर्वरित ४ कामे रद्द करण्‍यात आली आहे. अटल भूजल योजने अंतर्गत पाझर तलाव दुरुस्ती, नवीन सिमेंट नाला बांधकाम, को.प.बंधारा बांधकाम व दुरुस्तीचे कामे करण्‍यात आली आहे.