एकत्रित आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना.
महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना(पूर्वीची राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना) २ जुलै २०१२ पासून प्रायोगिक तत्त्वावर आठ जिल्ह्यांमध्ये सुरू केली आणि नंतर ही योजना २१ नोव्हेंबर २०१३ पासून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये विस्तारित करण्यात आली. सदर महत्त्वाकांक्षी योजना सुरुवातीला कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी सुरू करण्यात आली आणि नंतर वेळोवेळी इतर लाभार्थी गट त्यामध्ये समाविष्ट करण्यात आले.
आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना दि.२३ सप्टेंबर,२०१८ पासून भारत सरकारव्दारे लागू करण्यात आली. या योजनेत समाविष्ट केलेली कुटुंबे अनुक्रमे ग्रामीण आणि शहरी भागांसाठी सामाजिक-आर्थिक जातनिहाय जनगणना २०११ च्या वंचित आणि व्यावसायिक निकषांवर आधारित होती. सदर योजनेकरिता येणाऱ्या खर्चामध्ये भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांचा हिस्सा ६०:४० च्या प्रमाणात आहे.
दि.१.०४.२०२० पासून एकत्रित आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राज्यात सुधारित स्वरुपात राबविण्यात येत आहे. या एकत्रित योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमार्फत निवडक आजारांच्या उपचारांसाठी रोख रक्कम विरहीत दर्जेदार वैद्यकीय सेवा दिल्या जातात.
महाराष्ट्र शासनाने २८ जुलै २०२३ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे राज्यातील सर्व कुटुंबांसाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे आणि विद्यमान योजनेची व्याप्ती वाढवली आहे. या योजनेत महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचा समावेश आहे आणि रुग्णालयात दाखल होणे आवश्यक असलेल्या व्दितीय व तृतीय प्रकारच्या आरोग्य सेवांसाठी प्रति वर्ष ५ लाख रुपयांचे १३५६ आजारांकरिता आरोग्य कवच प्रदान करते.
एकत्रित योजने ठळक वैशिष्ट्ये
- महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी आरोग्य संरक्षण
- अंगीकृत रुग्णालयांमध्ये रोख रक्कम रहीत व्दितीय व तृतीय प्रकारचे उपचार
- प्रति वर्ष रु. ५ लाखांचे १३५६ आजारांकरिता आरोग्य संरक्षण कुटुंबातील एक किंवा सर्व सदस्य वापरू शकतात.
- रुग्णालयात दाखल होणे आवश्यक असलेल्या ३४ विशेष सेवांतर्गत शस्त्रक्रिया/उपचारांच्या वैद्यकीय सेवा
- योजनेत असलेले सर्व आजार पहिल्या दिवसापासून समाविष्ट आहेत.
- महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतील लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय/खाजगी अंगीकृत रुग्णालयांमध्ये उपचार घेऊ शकतात.
- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ देशभरात कोणत्याही राज्यातील अंगीकृत रुग्णालयात घेता येतो.
- योजनेसाठी समर्पित कॉल सेंटर जेथे लाभार्थी योजनेची माहिती मिळवू शकतात आणि योजनेअंतर्गत सेवांबद्दल तक्रार करू शकतात.
- योजना पूर्णपणे कागदविरहीत व संगणक प्रणालीव्दारे राबविली जाते.
- लाभार्थ्यांना मदत आणि सहाय्य पुरविण्याठी प्रत्येक अंगीकृत रुग्णालयामध्ये आरोग्यमित्र नियुक्त केले आहेत.
लाभार्थी:
महाराष्ट्र शासन
फायदे:
वर सांगितल्या प्रमाणे
अर्ज कसा करावा
वरील विभागाशी संपर्क साधा