बंद

    शिक्षण विभाग ( माध्यमिक )

    परिचय

    जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या माध्यमिक शाळेवर शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार सनियंत्रण ठेवण्याचे काम करणे तसेचमाध्यमिक शाळेतील विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढविणे इत्यादी प्रकारचे कामकाजकरणे

    व्हिजन आणि मिशन

    कार्यासनाचे कामकाज सांभाळणारे कर्मचारीसंबंधित विष्ंयाची संचिका खालील प्रमाणे सादर करतात.
    आस्थापना विषयक बाबी- कनिष्ठ प्रशासन अधिकारी, उपशिक्षणाधिकारी (आस्थापना) यांचे मार्फत शिक्षणाधिकारी (माध्यमिक )यांचेकडे अंतिम निर्णय/ मान्यतेसाठी सादर केले जातात.
    लेखा विषयक बाबी–अधीक्षक राजपत्रित व उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचे मार्फत शिक्षणाधिकारी (माध्यमिक )यांचेकडे अंतिम निर्णय/ मान्यतेसाठी सादर केले जातात.
    शिक्षण विभागातील विविध योजना — कनिष्ठ प्रशासन अधिकारी, अधीक्षक राजपत्रित व उपशिक्षणाधिकारी संबंधित कार्यासनाचे कर्मचा-यांची तालुकास्तरावरुन माहिती/ अहवालप्राप्त करुन सादर करण्याची जबाबदारी आहे. व या कामावर पर्यवेक्षणकरण्याची संबंधित कार्यासनाच्या कर्मचा-यांची त्यांच्याकडे असलेल्याअभिलेख्यांचे अद्यावतीकरण करुन ठेवण्याची जबाबदारी आहे.

    उद्दिष्टे आणि कार्ये

    शिक्षण समिती सभा

    शिक्षण समिती सभा दर महा घेण्याची तरतुद आहे. यासभेच्या कामकाजात शिक्षण समितीतील सर्व जिल्हा परिषद सदस्य सहभाग घेतात.शिक्षण विभाग संकलनामार्फत या सभेचे आयोजन करण्यात येते. शिक्षण समितीसभेमध्ये चिषय पत्रिका नोटीस सभेपुर्वी 10 दिवस अगोदर पाठविली जाते. सभेचेइतिवृत्त घेवून मा. अध्यक्ष, शिक्षण समिती यांचे मानयतेने अंतिम करुन सर्वसन्ताननीय सदस्य यांना पाठविले जाते.