ओळख प्रस्तावना :
राज्यातील ग्रामीण भागातील गरीबीचे निर्मुलनकरण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोंनती अभियानाचीसुरुवात सन २०११ मध्ये केली. महाराष्ट्र राज्यात सदरील अभियानाचीअंमलबजावणी करण्यासाठी मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामविकासविभांगांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोंनती अभियान या स्वतंत्रसंस्थेची स्थापना संस्था नोंदणी अधिनियम १८६० अन्वये करण्यात आलेली आहे.याबाबत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने दिनांक १८जुलै २०११ रोजी सविस्तर शासन निर्णय निर्गमित केला .
स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेचे राष्ट्रीयग्रामीण जीवनोन्नती अभियानात रुपांतर करण्यात आलेले आहे. राज्यातमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोती अभियान (उमेद) हे अभियान राबविण्या तयेत आहे. उमेद अभियानाचे संचालन ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासनयांच्याकडून केले जाते.