परिचय
जिल्हा परिषदे मध्ये ग्रामीण भागातील जनतेसाठीज्या काही योजना राबविल्या जातात त्यामध्ये दळण वळण व मुलभुत सुविधापुरविण्याचे कामे पार पाडली जातात. त्यातील काही महत्वाच्या योजना व त्याचातपशील खालील प्रमाणे आहे.
- ग्रामीण रस्ते विकास व मजबुती करण (लेखाशिर्ष 3054-2188) :-
- इतर जिल्हा रस्ते विकास व मजबुती करण (लेखाशिर्ष 5054-4658):-
- ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग रस्त्याची सुधारणा व दुरुस्ती करणे (लेखाशिर्ष 3054-2419)
- उपरोक्त योजने व्यतिरिक्त:-
- जिल्हा परिषद स्तरावरील प्राथमिक शाळा / माध्यमिकशाळा बांधकामे व दुरुस्ती, अंगणवाडी बांधकामे व दुरुस्ती, प्रभागसंघ इमारतबांधकाम, पशुवैद्यकीय दवाखाने बांधकामे व दुरुस्ती, प्राथमिक आरोग्यकेंद्रे / उपकेंद्रे बांधकामे व दुरुस्ती, तांडा वस्ती सुधार योजना, अनुसुचित जाती व बौध्द वस्ती सुधार योजना, अल्पसंख्याक ग्रामीण विकासयोजना, समाज मंदिर बांधकामे, स्मशान भुमी बांधकामे, तसेच 15 वा वित्तआयोगातील मंजुर विविध कामांची अंदाज पत्रके तयार करणे, निविदा करणे, तांत्रिक दृष्ट या मार्गदर्शन् काम पूर्ण करुन घेवु नदेयके अदाईगी करणेइत्यादी कामे या विभागा मार्फत केली जातात.
जिल्हा परिषदे अंतर्गत विविध योजनेची बांधकामे वदुरुस्ती कामे करण्यासाठी शासन निर्णया नुसार जिल्हा परिषदे कडीलकंत्राटदार नोंदणी अनिवार्य असुन, या विभागा मार्फत मजुर सहकारी संस्था /वैयक्तिक कंत्राटदार / पदवी व पदाविकाधारक अभियंतायांचे साठी, कंत्राटदारनोंदणी केली जाते.
जिल्हा वार्षिक योजने तून सदर योजने साठी दरवर्षीनिधी प्राप्त होतो. या निधीमधुन जिल्हा परिषदे कडील ग्रामीण भागातीलग्रामीण मार्ग (V.R) ची दुरुस्ती व मजबुती करणाची कामे हाती घेतली जातात. सदर कामे हाती घेताना रस्त्या च्या पृष्ठाभागाच्या प्राधान्य क्रम यादीतील (P.C.I.1) पी.सी.आय एक मध्ये समाविष्ठ असलेली व ग्रामीण रस्त्याची लांबीदुरुस्ती व मजबुती करणासाठी प्स्तावितव मंजुरकेली जातात.
जिल्हा वार्षिक योजनेतून सदर योजनेसाठी दरवर्षीनिधी प्राप्त होतो. या निधी मधुन जिल्हा परिषदेकडील ग्रामीण भागातील इतरजिल्हा मार्ग (O.D.R) ची दुरुस्ती व मजबुती करणाची कामे हाती घेतली जातात. सदर कामे हाती घेताना रस्त्या च्या पृष्ठा भागाच्या प्राधान्य क्रमयादीतील (P.C.I.–1) पी.सी.आय एक मध्ये समाविष्ठ असलेली व ग्रामीण रस्त्याचीलांबी दुरुस्ती व मजबुती करणासाठी प्रस्तावित व मंजुर केली जातात.
शासन स्तरावरुन ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग रस्त्याच्या विशेष दुरुस्ती , किरकोळ दुरुस्ती , पुल बांधकामे , सुधारणा करणे व डांबरीकरण करणे या कामा करिता मागणी प्रमाणे निधी उपलब्ध्र होतो व कामे मंजुर व पुर्ण केली जातात.