बंद

    ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद जालना

    जल जीवन मिशन

    “हर घर जल हर घर नल”

    • पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग , महाराष्ट्र शासन चे शासन निर्णय दि. ४/९/२०२० अन्वये राज्यात जल जीवन मिशन राबविण्यासाठी खालील मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत – ५५ लिटर प्रति दिन दरडोई नुसार शुद्ध पिण्यायोग्य पाणी पुरवठा करण्याचे धोरण.
    • सर्व योजना ह्या ३० वर्षाकरिता संकल्पित.
    • State Level Scheme Sanctioning Committee ( SLSSC) द्वारे जालना जिल्ह्याचा सन २०२२-२३ चा जल जीवन कार्यक्रमाचा जालना जिल्ह्याचा मंजूर आराखडा ( Saturation Plan ) मध्ये एकूण ७३३ योजनांचा समावेश असून किमत रु. ५०७.७३ कोटी आहे.
    • शासन निर्णय दि. ११/०२/२०२१ अन्वये मा.जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समिती जालना (DWSM) गठीत असून सदर समितीचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद हे सहअध्यक्ष आहेत, तसेच विविध खात्याचे १४ अधिकारी समितीचे सदस्य आहेत. DWSM द्वारे शासन निर्णय दि. २९/०६/२०२२ नुसार दरडोई खर्चाच्या निकषात असणाऱ्या रु. ५ कोटी पर्यंतच्या योजनास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
    • जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार वापकॉस लिमिटेड (WAPCOS Ltd.) व नाबार्ड कंसलटन्सी ( Nabcon) या सहाय्य संस्थेची शासनाकडून निवड . सदर संस्था पाणी पुरवठा योजनांचे सर्वेक्षण करणे, प्रकल्प अहवाल (DPR) तयार करणे, तांत्रिक पर्यवेक्षण करणे ई. कामे करत आहे.
    • योजनेची त्रयस्थ तांत्रिक तपासणी करण्यासाठी शासनाने टाटा कंसलटन्सी (TCS) यांची नेमणूक करण्यात आली आहे.
    • मंजूर कामांची यादी सोबत जोडण्यात येत आहे.