ग्रामपंचायती स्वावलंबी होवून त्यांना स्वायत्तसंस्थाप्रमाणे आपला कारभार करण्याचे सामर्थ्य प्राप्त व्हावे म्हणूनकेंद्शासनाने 73 वी घटना दुरूस्ती केली . त्यामुळे ग्रामपंचयतींनाघटनात्मक दर्जा प्राप्त झाला आहे .अशा त-हेने ग्रामपंचयतीची वाटचाल गावातीललोकांना सामाजिक न्याय मिळावा आणि त्यांचा आर्थिक विकास व्हावा या दिशेनेसुरू झाली आहे. देशाचा सर्वागिंन विकास होण्यासाठी केंद्गशासनाकडून विविधप्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत. विकास योजनाचा लाभ अगदी तळागाळातीलमाणसाला मिळावा व त्यांची उन्नती / प्रगती व्हावी यासाठी सत्तेचेविकेंद्गीकरण करून जिल्हा परिषद समित्या व ग्रामपंचायती यांना अधिकारदेण्यात आले. शासन विविध योजनाᅠराबवते या योजनांचा ख-या अर्थाने .लाभ होवूनगरीब जनतेचे जीवन सुधारणे हा हेतू आहे. विविध शासकिय योजनांचा लाभ घेवूनग्रामीण लोकांचे राहणीमान उंचावणे ही शासनाची अपेक्षा आहे. अशा सर्वयोजनांची माहिती जनतेपर्यत पोहचणे अत्यंत महत्वाचे आहे. जालना जिल्हाहा 08 तालुक्यामध्ये विभागलेला असून एकूण 778 ग्रामपंचायती कार्यरत आहेत.कार्यरत ग्रामपंचायतची एकूण लोकसंख्या 1305000 इतकी आहे त्यापैकीअनुसूचित जातीची लोक संख्या व अनुसूचित जमातीची लोक संख्या——— इतकी आहे. ग्रामीण भागाच्या क्षेत्रफाळाचा विचार करायाचा झाल्यास ————–चौ.कि.मी. ने व्यापलेला आहे. ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांपर्यतप्रस्तुत केलेल्या विविध शासकिय (केंद्ग शासन,राज्य शासन ) योजनाग्रामपंचायत विभाग ,जिल्हा परिषदेमार्फत प्रभाविणे राबविल्या जातआहेत.सर्वसामान्य व्यक्तीबरोबरच , मागासवर्गीय व दारिद्र्य रेषेखालीलव्यक्ती दारिद्र्य रेषेच्या वर आणुन त्याला आर्थिकदृष्टया स्वंयपुर्ण करणेहीच एकमेव ध्येयपूर्ती असून जिल्ह्यामध्ये त्याची चांगल्या पध्दतीनेअंमलबजावणी ग्रामपंचायत विभाग ,जिल्हा परिषद मार्फत करणेत येत आहे.
ग्रामपंचायत विभाग
उद्दिष्टे आणि कार्ये
- 15 वा विव्त आयोग व आमचं गाव आमचा विकास.
- राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान.
- जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत ग्रामपंचायतील जनसिुवधसे साठी वशेष अनुदान.
- जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत मोठया ग्रामपंचायतीला नागरी सुविधेसाठी विशेष अनुदान.
- अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्ष्रेत्रात मूलभुत पायाभूत सुविधा.
- आर.आर.(आबा) पाटील सुंदर ग्राम योजना.
- आपले सरकार सेवा केंद्र.
- गावठाण जमाबंदी.
- वृक्ष लागवड.