बंद

    आरोग्य विभाग

    प्रस्तावना

    भारतात आरोग्य सेवा पध्दती ब्रिटीश राजवटीपासून सुरु झाली. सुरवातीस आरोग्य सेवेची उददीष्ट सैनिक व युरोपीयन नागरी नोकरांना सेवा देणे हे होते व साथरोग नियंत्रण उदा.प्लेग, कॉलरा, देवी हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने प्राधान्याने कॅन्टोमेंट भागात सुरु केली. ब्रिटीश राजवटी पाश्चात पध्दतीचे औषधोपचार सुरु केल्यामूळे अस्तित्वात असलेल्या पारंपारिक औषधोपचार व आयुर्वेदिक उपचार याकडे दुर्लक्ष झाले. सुरवातील मोठया शहरात हॉस्पिटल व दवाखाने यांच्यामार्फत उपचारात्मक सेवा देणे सुरु केले. नियोजन समितीने 1940 साली ग्रामीण भागात आरोग्य सेवा देणेची सूचना केली व 1000 लोकसंख्येला 1 आरोग्य सेवक व प्रमाणात आरोग्य सेवकांना आरोग्य सेवा देण्यासाठी प्रशिक्षण आयोजित केले पहिले प्राथमिक आरोग्य केंद्ग 1942 साली कलकत्याजवळ (पश्चिम बंगाल) शिंगुर या गावी सुरु केले. त्याला ग्रामीण आरोग्य पथक असे संबोधण्यात आले.

       ग्रामीण आरोग्य सेवा डॉ.जेम्स ग्रॅड, संचालक, अखिल भारतीय स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविला आहे. त्याचसुमारास मुंबई प्रांत सरकारच्या आर्थिक सहाय्याने आरोग्य सेवा पदध्ती महाराष्ट्र राज्यात सुरु करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांचे दवाखाने राज्यात सोयीच्या ठिकाणी सुरु करण्यात आले त्यालाच नागरी दवाखाने म्हणत नंतर हे सर्व दवाखाने जिल्हा परिषदेमध्ये वर्ग करण्यात आले. 1977 साली झालेल्या 13 व्या जागतीक आरोग्य परिषदेमध्ये आरोग्य संघटना व त्याचे सभासद देश यांनी समाजाचे आरोग्य एका ठराविक पातळीवर संवादाचे मुख्य उदिदष्ट ठरविले हेच 2000साली सर्वांना आरोग्य या नावाने प्रसिध्द झाले. या उदिदष्ट पूर्तीसाठी प्राथमिक आरोग्य सेवा हिच गुरुकिल्ली आहे हे स्विकत करण्यात आले.

    आरोग्य संस्थाद्वारे मिळणाऱ्या विविध सेवा

    माता आणि बालकांचे आरोग्य :-

    अ) प्रसुतीपूर्व काळजी :-

    सर्व गरोदर स्त्रियांची नोंदणी (१२ आठवडयांचे आत) गरोदरपणात कमीत कमी पाच वेळा तपासणी :- पहिली तपासणी गरोदरपणाची शक्यता वाटल्याबरोबरच, दुसरी तपासणी (१२ आठवडेत) तिसरी तपासणी ४ ते ६ महिन्यांमध्ये (२६ आठवडे) चौथी तपासणी आठव्या महिन्यामध्ये (३२ आठवडे) तर पाचवी तपासणी ९ व्या महिन्यामध्ये (३६ आठवडे) संलग्र आवश्यक सेवा जसे सर्वसाधारण तपासणी, वजन, रक्तदाब,रक्तक्षया करिता तपसणी, पोटावरुन तपासणी , उंची, स्तनांची तपासणी, पहिल्या तिमाहीत फोलिक अ‍ॅसिडचे सेवन, १२ आठवडयानंतर लोह, फोलिक अ‍ॅसिड गोळयांचे सेवन, धर्नुवात प्रतिबंधक लसीची मात्रा, रक्तक्षयावरील उपचार इ. (आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यिका यांच्यासाठी मार्गदर्शक सूचनांनूसार) प्रयोग शाळेतील तपासण्या जसे हिमोग्लोबीन, लघवीतील प्रथिने व साखरेची तपासणी. जोखमीच्या गरोदर मातांचे निदान व तत्पर योग्य ठिकाणी संदर्भसेवा.

    ब) प्रसुती दरम्यान सेवा :-

    आरोग्य संस्थेत प्रसुती करण्यावर भर देणे. (प्रवृत्त करणे) स्वच्छतेच्या ५ नियमांचे पालन करुन प्रशिक्षित व्यक्तीकडून बाळंतपण करणे. तत्पर व योग्यठिकाणी संदर्भसेवा देणे.

    क) प्रसुती पश्चात सेवा :-

    प्रसुती पश्चात कमीत कमी २ वेळा गृहभेटी देणे. पहिली प्रसुतीनंतर ४८ तासांच्या आत तर दुसरी ७ ते १० दिवसांच्या दरम्यान गृहभेट देणे. मूल कमी वजनाचे असल्यास ४८ तासांच्या आत तसेच ७,१४,२१ व २८ दिवसात अशा पाच भेटी द्याव्यात. प्रसुतीनंतर अर्ध्या तासाच्या आत स्तनपान सुरु करणे. सल्ला व समुपदेशन :- आहार व विश्रांती, स्वच्छता, गर्भनिरोध, नवजात बालकाची काळजी, अर्भक व मुलांचा आहार तसेच लैगिक आजार, एच.आय.व्ही.एड्‌स इ.बाबत.

    क) प्रसुती पश्चात काळजी :-

    उपकेंद्गाच्या कर्मचार्‍यामार्फत कमीत कमी २ प्रसुतीपश्चात गृहभेटी :- पहिली प्रसुतीनंतर ४८ तासांच्या आत व दुसरी प्रसुतीनंतर ७ दिवसांच्या आत. प्रसुतीनंतर अर्ध्या तासाच्या आत स्तनपान सुरु करणे. आहार, स्वच्छता, कुटूंब नियोजना बाबत आरोग्य शिक्षण देणे.

    ड) बालकाचे आरोग्यः-

    • नवजात अर्भकाची काळजी
    • ६ महिन्यांपर्यंत निव्वळ स्तनपान देणे.
    • सर्व अर्भकांचे व मुलांचे लसीकरणाने टाळता येणार्‍या आजारांविरुध्द लसीकरण करणे.
    • ५ वर्षापर्यंत सहा-सहा महिन्यांनी अ जिवनसत्वे ९ डोस देणे.
    • बालकांमधील कुपोषण आणि आजारांचे प्रतिबंधन व उपचार करणे.

    बालकांची काळजी :-

    • अ) नवजात अर्भकाची काळजी :-
    • नवजात अर्भकासाठी सोयी व तज्ञसेवा

    नवजात अर्भकामधील तापमान कमी होण व कावीळ आजाराचे व्यवस्थापन.

    • ब) बालकाची काळजीः-
    • नवजात शिशु व बालकांमधील आजारांच्या एकात्मिक व्यवस्थापनासह (IMNCI) आजारी बालकांची तातडीची काळजी.
    • बालकांमधील नेहमीच्या आजारांची काळजी.
    • जन्मानंतर पहिले सहा महिने निव्वळ स्तनपानास प्रवत्त करणे.
    • लसीकरणाने टाळता येणार्‍या आजारांविरुध्द मार्गदर्शक सूचनांप्रमाणे अर्भकांचे व बालकांचे संपूर्ण लसीकरण करणे.
    • अ जीवनसत्वाचे प्रतिबंधात्मक डोस देणे.

    कुपोषणजंतूसंसर्ग यांसारख्या बालकांमधील आजारांचे प्रतिबंधन व नियंत्रण इ.

    • कुटूंब नियोजन आणि गर्भनिरोधन :-

    कुटूंब कल्याणाची योग्य ती पध्दत वापरण्यासाठी, आरोग्य शिक्षण देणे, प्रवत्त करणे व समुपदेशन करणे. कुटूंब नियोजनाच्या साधनांची उपलब्धता-निरोध, तांबी, तोंडाने घ्यावयाच्या गर्भनिरोधक गोळया,अंतरा इंजेक्शन तात्काळ गर्भनिरोधन.इ.कुटूंब कल्याणाच्या कायमस्वरुपी पध्दती अवलंबणार्‍या योग्य जोडप्यांसाठी पाठपुराव्याच्या सेवा. आवश्यकतेनुसार सुरक्षित गर्भपातासाठी समुपदेशन व योग्य प्रकारे संदर्भसेवा,कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिरे

    • पौगंडावस्थेतील आरोग्य सेवा :-

    आरोग्य शिक्षण, समुपदेशन व संदर्भसेवा शालेय आरोग्य सेवेसाठी मदत

    • उपचारात्मक सेवा :-

    किरकोळ आजारावर औषधोपचार उदा.ताप, अतिसार, श्वसनसंस्थेचे आजार, जंताचे विकार, अपघात व तात्कालिक परिस्थितीत करावयाचे प्रथमोपचार. तत्पर व योग्य संदर्भसेवा. प्राथमिक आरोग्य केंद्गाचे वैद्यकीय अधिकारी आशा अंगणवाडी सेविका, पंचायत राज संस्था, स्वयंसहाय्यता गट यांच्या मदतीने अंगणवाडीमध्ये कमीत कमी दरमहा एक आरोग्य दिवस आयोजित करणे.

    • जीवनविषयक घटनांची नोंद:-

    जन्म – मृत्यू, माता मृत्यू , अर्भकमृत्यू यांसारख्या जीवनविषयक आकडेवारीची (घटनांची) नोंद घेणे व अहवाल पाठविणे (२१ दिवसांचे आत)

     

    प्राथमिक आरोग्य केंद्ग

    • अ) वैद्यकीय सेवा

    बाहयरुग्ण सेवा :- ४ तास सकाळी व २ तास संध्याकाळी.

    २४ तास तातडीची सेवा :- जखमा व अपघात यांचे योग्य व्यवस्थापन व प्रथमोपचार, संदर्भसेवेपूर्वी रुग्णाला जीविताचे धोक्याबाहेर आणणे, श्वानदंश, विंचूदंश, सर्पदंश व इतर तातडीच्या रुग्णांना योग्य सेवा प्रस्तुती सेवा देणे.

    संदर्भ सेवा :- ज्या रुग्णाला विशेषज्ञांच्या सेवेची आवश्यकता आहे अशा रुग्णांना योग्य व तत्पर संदर्भसेवा :- रुग्णांना पुर्वपदावर आणणे ( Stablization ) संदर्भसेवेच्या प्रवासा दरम्यान रुग्णांना योग्य त्या अनुषंगिक सेवा देणे. प्रा.आ.केंद्गाच्या वाहनातून अथवा वैद्यकीय अधिकार्‍यांजवळ असलेल्या उपलब्ध अनुदानातून, भाडयाच्या वाहनातून संदर्भसेवा देणे.

    आंतररुग्ण सेवा ( ६ बेड )

    कुटूंब कल्याण सेवा

    योग्य कुटूंब नियोजनाच्या पध्दती अवलंबिण्यासाठी शिक्षण, मतपरिवर्तन व समुपदेशन करणे. गर्भनिरोधक साधने उपलब्ध करुन देणे. उदा.निरोध, तोंडाने घ्यावयाच्या गर्भनिरोधक गोळया, तातडीच्या वेळी घ्यावयाच्या गर्भनिरोधक गोळया, तांबी,अंतर इंजेक्शन

    इ.कायमस्वरुपी पध्दती जसे स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया , पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया/बिनटाकाच्या पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया शस्त्रक्रियेसारख्या कुटूंब नियोजनाच्या कायमस्वरुपी पध्दती अवलंबिलेल्या योग्य जोडप्यांसाठी पाठपूरावा सेवा प्रशिक्षित व्यक्त्‌ी व साधने उपलब्ध आहेत अशा ठिकाण डाटा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वैद्यकीय गर्भपाताच्या सेवा व त्यासाठी योग्य ते प्रशिक्षण घेणेत येईल.

    वरील सेवांखेरील प्राथमिक आरोग्य केंद्ग जननी सुरक्षा योजनेच्या सुविधाही पुरवतील.

    प्रजनन संस्थेचे आजार / लैगिक आजारांचे व्यवस्थापन

    प्रजनन संस्थेचे आजार/लैंगिक आजार यांच्या प्रतिबंधनासाठी आरोग्य शिक्षण प्रजनन संस्थेचे आजार/लैगिक आजार यांचा उपचार. आहारविषयक सेवा (एकात्मिक बालविकास सेवा योजनेबरोबर समन्वयाने) शालेय आरोग्य :- नियमित तपासणी, योग्य उपचार, संदर्भसेवा व पाठपूरावा. पौगंडावस्थेतील आरोग्य सेवा :- जीवनकौशल्या प्रशिक्षण, समुपदेशन, योग्य उपचार. सुरक्षित पाठपुरावा व स्वच्छता यांसाठी प्रवृत्त करणे. त्या भागात कायमस्वरुपी आढळणारे आजार. उदा.हिवताप, काला आजार, जपानी, मेंदूदाह इत्यांदीचे प्रतिबंधन व नियंत्रण. रोगसर्वेक्षण आणि साथीच्या आजारांवर नियंत्रण अस्वाभाविक आरोग्य घटनांबाबत जागरुकता व योग्य उपाययोजना पाणी साठयांचे निर्जुंतीकरण पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी राष्ट!ीय साथरोग नियंत्रण संस्थेने तयार केलेल्या टेस्टच्या सहाय्याने करावी. सेप्टीक संडासचा वापर, कचर्‍याची योग्य विल्हेवाट यांसह स्वच्छतेसाठी प्रवृत्त करणे. जीवनविषयक आकडेवारीची संकलन व अहवाल सादरीकरण. आरोग्य/शिक्षण वर्तणुकीतील बदलासाठी संदेशवहन. राष्ट्रीयएडस नियंत्रण कार्यक्रमासह इतर राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबविणे. नेहमीच्या व तात्काळ उपचार सुविधा – या सेवा

    जे रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्गात येतात त्यांना व जे रुग्ण उपकेंद्गावरुन अथवा अन्य ठिकाणांहून संदर्भसेवा दिल्याने येतात त्यांना या सेवा उपलब्ध व्हाव्यात. या सेवात खालील गोष्टींचा समावेश होतो.उपचार देणे किंवा प्राथमिक आरोग्य केंद्गात उपचार करणे शक्य नसलेल्या रुग्णांना संदर्भसेवा. रुग्णालयात दाखल करावायाची गरज आहे अशांना आंतररुग्ण उपचार देणे.

    • राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी :-
    1. राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रम
    2. राष्ट्रीय आर.सी.एच कार्यक्रम
    3. राष्ट्रीय किटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम
    4. सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम
    5. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम
    6. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम
    7. राष्ट्रीय एडस नियंत्रण कार्यक्रम या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी जालना जिल्हयात खालील संस्था कार्यरत आहेत.
    8. राष्ट्रीय साथरोग नियंत्रण कार्यक्रम
    9. राष्ट्रीय पल्स पोलीओ नियंत्रण कार्यक्रम
    10. राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रम
    11. मानव विकास कार्यक्रम
    12. जननी सुरक्षा योजना
    13. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना
    14. महात्मा ज्योतीराव फ़ुले जन आरोग्य योजना (MJPAY)
    15. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (आयुष्यमान भारत PMJAY)

    उद्दिष्टे

    1. आरोग्य परिणाम सुधारणा

      प्रभावी आरोग्य हस्तक्षेप, लवकर निदान आणि सुधारित उपचार पद्धतीद्वारे रोगजन्यता, मृत्यू दर आणि अपंगत्व दर कमी करणे.

    2. आरोग्य सेवांची प्रवेश क्षमता वाढवणे

      प्रत्येकाला, त्यांच्या सामाजिक-आर्थिक स्थिती, भौगोलिक स्थान किंवाजनसांख्यिक विशेषतांचा विचार न करता, आरोग्य सेवांमध्ये समान प्रवेश मिळवूनदेणे. विशेष लक्ष कमजोर गटांना, जसे की वृद्ध, मुले आणि कमी उत्पन्नअसलेले लोक यांना दिले जाते.

    3. आरोग्य प्रणाली बळकटीकरण

      एक मजबूत आरोग्य सेवा पायाभूत संरचना तयार करणे आणि ती टिकवून ठेवणे, ज्यामध्ये प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी, आधुनिक आरोग्य सुविधा आणिअत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे असतात. आरोग्य संकटांना प्रतिसाद देण्यासाठीप्रणाली सक्षम आणि सक्षम असावी हे सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे.

    4. समुदाय सहभाग वाढवणे

      स्थानिक समुदायांना आरोग्य उपक्रमांमध्ये सक्रिय भूमिका घेण्यासाठीप्रोत्साहित करणे. यामध्ये समुदाय-आधारित आरोग्य कार्यक्रमांचा प्रचारकरणे, स्थानिक आरोग्य नेत्यांना सशक्त करणे आणि निर्णय प्रक्रियेतसार्वजनिक सहभाग सुनिश्चित करणे यांचा समावेश होतो.

    5. आरोग्य ट्रेंड्सचे निरीक्षण आणि मूल्यांकन करणे

      आरोग्य डेटा सतत निरीक्षण करणे, महत्त्वाचे निर्देशांक (जसे की रोगाचीप्रसार दर, लसीकरण दर आणि मृत्यू दर) ट्रॅक करणे आणि विद्यमान आरोग्यकार्यक्रमांची प्रभावीता मूल्यांकन करणे जेणेकरून सुधारणा करण्याच्याक्षेत्रांची ओळख होईल.

    6. आरोग्य धोरणे तयार करणे आणि अंमलबजावणी करणे

      सार्वजनिक आरोग्य, सुरक्षा आणि कल्याणाला प्रोत्साहन देणारी धोरणे तयारकरणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे. यामध्ये स्वच्छता, अन्न सुरक्षा, पर्यावरणीय आरोग्य, लसीकरण आणि रोग नियंत्रण यासंबंधी नियामक उपाय समाविष्टआहेत.

    7. हितधारकांसोबत सहकार्य करणे

    आरोग्य सेवा प्रदाते, स्थानिक सरकार, ना-नफा संस्था, समुदाय गट आणि इतरहितधारकांसोबत सामूहिक आरोग्य उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मजबूत भागीदारीतयार करणे.

     

    हे ध्येय आणि उद्दिष्टे आरोग्य विभागांना त्यांच्या लोकसंख्येच्याविशिष्ट आरोग्य गरजांना उत्तर देणारी धोरणे आणि कार्यक्रम तयार करण्यासाठीमार्गदर्शन करतात. रोग प्रतिबंध, प्रवेश योग्यता आणि आरोग्य सुधारणा यावरलक्ष केंद्रित करून, आरोग्य विभाग समग्र सार्वजनिक कल्याण वाढवण्यासाठी आणिसर्वांसाठी निरोगी भविष्य सुनिश्चित करण्यासाठी काम करतात.

    1. प्रजनन व बाल आरोग्य

    URL:-  https://rch.mohfw.gov.in/

    RCH (Reproductive and Child Health) पोर्टलचा उद्देश देशातील प्रत्येक गर्भवती महिला आणि बालकाची नोंदणी करून त्यांना आवश्यक आरोग्य सेवा मिळवून देणे हा आहे. हे एकात्मिक व्यासपीठ आरोग्य कर्मचाऱ्यांना वास्तविक वेळेत डेटा संकलित करण्यास आणि योग्य हस्तक्षेप करण्यास सक्षम करते.

    पोर्टलची मुख्य कार्ये:-

    1. लाभार्थी नोंदणी: गर्भवती महिला आणि बालकांची सहज नोंदणी आशा/एएनएम द्वारे.
    2. सेवांचा मागोवा: लसीकरण आणि प्रसूतीपूर्व तपासणी सेवांचा मागोवा.
    3. आरोग्य नोंदी: लाभार्थ्यांच्या डिजिटल आरोग्य नोंदी व्यवस्थापित करणे.

    आरसीएच आयडी:-

    सर्व एएनसी आणि मुलांचे आरसीएच आयडी आमच्या एएनएम/आशा कडून या पोर्टलद्वारे जनरेट  करणे आवश्यक आहे. आरसीएच आयडी, किंवा प्रजनन आणि बाल आरोग्य आयडी, हा भारतातील प्रजनन आणि बाल आरोग्य (आरसीएच) कार्यक्रमांतर्गत व्यक्तींना, विशेषतः गर्भवती महिलांना नियुक्त केलेला एक अद्वितीय ओळख क्रमांक आहे. महिलेच्या पुनरुत्पादक जीवनचक्रादरम्यान आणि तिच्या बाळाच्या सुरुवातीच्या विकासासाठी आरसीएच सेवांचा मागोवा घेण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी हे आयडी महत्त्वाचे आहे.

    ट्रॅकिंग आणि देखरेख:

    1. आरसीएच आयडी आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रजनन जीवनचक्रात, गर्भधारणेपासून बालपणापर्यंत व्यक्तींचा मागोवा घेण्यास अनुमती देते.
    2.  हे प्रसूतीपूर्व काळजी घेण्याची आवश्यकता असलेल्या महिलांना ओळखण्यास मदत करते , प्रसूतीनंतरची काळजी , किंवा लसीकरण , त्यांना वेळेवर सेवा मिळतील याची खात्री करणे.
    3. हे उच्च-जोखीम असलेल्या गर्भधारणेची ओळख पटवण्यास आणि त्यांच्या आरोग्याच्या स्थितीचा मागोवा घेण्यास देखील मदत करते.

    २.आयुष्मान भारत डिजिटल मिशन 

    URL :- https://abha.abdm.gov.in/

    ABHA (Ayushman Bharat Health Account) आयडीचे (ID) अनेक फायदे आहेत. हे एक डिजिटल आरोग्य खाते आहे, जे तुम्हाला तुमच्या आरोग्यविषयक माहितीवर नियंत्रण ठेवण्यास आणि ती सुरक्षितपणे शेअर करण्यास मदत करते. यामुळे आरोग्य सेवा अधिक सुलभ आणि कार्यक्षम होतात

    ABHA आयडी :-

    ABHA आयडी तुमच्या आरोग्य नोंदी, जसे की वैद्यकीय चाचण्या, रिपोर्ट आणि प्रिस्क्रिप्शन, डिजिटल स्वरूपात साठवतो. यामुळे तुम्हाला कागदपत्रे सांभाळण्याची गरज नाही आणि आरोग्य सेवा प्रदात्यांना तुमच्या आरोग्य इतिहासाची माहिती त्वरित मिळते.

    3 नागरी नोंदणी पध्दती

    https://dc.crsorgi.gov.in/crs/

    या केंद्र शासनाच्या पोर्टल वर सर्व सामान्य नागरीक जन्म मृत्युची नोंद करु शकतात.केंद्र शासनाचा जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९ जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम (सुधारीत) २०२३ व महाराष्ट्र जन्म  आणि मृत्यू नियम २००० अन्वये महाराष्ट्र राज्यात जन्म मृत्यू घटनांची नोंदणी करणे सुलभ आहे.

    जन्म व मृत्यू नोंदणी कार्यपध्दती : खाली नमुद केलेल्या कालावधीच्या अटी प्रमाणे जन्म व मृत्यू नोंदणी होते.

    1. ० ते २१ दिवस (विहित कालावधी) मध्ये जन्म व मृत्युची मोफत नोंदणी व प्रमाणपत्र प्राप्त होते.
    2.  २१ ते ३० दिवस मध्ये विलंब शुल्क भरल्यानंतर जन्म व मृत्युची नोंदणी करता येते.
    3.  ३० दिवस ते १ वर्षापर्यंत जिल्हा निबंधक यांच्या लेखी परवानगीने आणि विलंब शुल्क भरल्यानंतर जन्म व मृत्युची नोंदणी करता येते.
    4. ०१ वर्षानंतर केवळ त्या कार्यक्षेत्रातील जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी किंवा जिल्हा दंडाधिकारी यांनी अधिकृत केलेल्या कार्यकारी दंडाधिकारी यांच्या आदेशाने विलंब शुल्क भरल्यानंतर नोंदणी करण्यात येईल. (महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग,शासन निर्णय क्रमांक : जमृनों २५२५/(इऑ.९९११८१)/ प्र.क्र.२२/कु.क दिनांक: 12 मार्च, 2025

    4 युवीन पोर्टल

    URL:-   https://uwin.mohfw.gov.in/

    उद्देश:   U-WIN हे  भारतातील  गर्भवती  महिला,  प्रसूती , नवजात बालके यांची  नोंदणी आणि मुलांसाठी लसीकरण सेवा डिजिटल करण्यासाठी डिझाइन केलेले एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. लसीकरणाद्वारे प्रतिबंधित करता येणाऱ्या १२ आजारांविरुद्ध जीवनरक्षक लसींचे वेळेवर प्रशासन सुनिश्चित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

    पोर्टलची मुख्य कार्ये:-

    1.  स्व-नोंदणी:   नागरिकांना U-WIN वेब पोर्टल किंवा U-WIN  मोबाइल अॅप्लिकेशन  https://uwinselfregistration.mohfw.gov.in/login वापरून स्व-नोंदणी करता येते . नागरिकांना लसीकरण केंद्रावर ANM आणि ASHA द्वारे देखील नोंदणी करू शकता..
    2.  कधीही, कुठेही लसीकरण:  या प्लॅटफॉर्मचा उद्देश लवचिक वेळापत्रक व  पर्यायांसह लसीकरण सेवा सुलभ करणे आहे आणि देशाच्या कोणत्याही भागात लसीकरण करण्याची परवानगी देतो..
    3.  अपॉइंटमेंट्स:  तुम्ही प्लॅटफॉर्मद्वारे ऑनलाइन किंवा लसीकरण केंद्रात जाऊन लसीकरण अपॉइंटमेंट्स शेड्यूल करू शकता.
    4. नोंदणीकृत मोबाइल द्वारे  एसएमएस अलर्ट:.    लाभार्थ्यांना नोंदणी पुष्टीकरण, लसीचे डोस आणि आगामी डोससाठी स्मरणासाठी स्वयंचलित एसएमएस अलर्ट मिळतात.
    5.  ईलसीकरण प्रमाणपत्रे:  लाभार्थी याना  दिलेल्या प्रत्येक लसीच्या डोससाठी QR-आधारित, डिजिटली पडताळणीयोग्य  लसीकरण प्रमाणपत्र मिळते
    6. आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना पाठिंबा:  U-WIN लसीकरण इतिहासाचा डिजिटल आढावा देऊन आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना मदत करते, जे लसीकरण सत्रांचे नियोजन आणि व्यवस्थापन करण्यास मदत करते.